Published On: Wed, Jan 1st, 2014 12:55 pm

डोकेदुखी आणि उपाय

Woman has a headache-1771929डोकेदुखी हा सर्वसामान्य आजार. आपलंही डोकं बरेचदा दुखत असतं. ही डोकेदुखी टाळता येणं शक्य आहे.

आपल्याला ताप देणारी डोकेदुखी ही अनेक कारणांनी उद्‍भवते. उच्च रक्तदाब, डोळ्याचा नंबर, पित्त होणं, अतिशय थंडीत किंवा कडक ऊन लागल्यास, काही प्रकारच्या तापात, मानसिक ताण असेल तर, बराच वेळ काही खाल्लं नसेल तर, नैराश्य असेल तर, अशी विविध कारणं त्यामागे असतात.

प्राथमिक उपचार

थोडक्यात काय, तर डोकेदुखीवर तातडीचा इलाज करणं गरजेचं आहे. डोकं दुखायला लागल्यावर आधी आपण किती वेळापूर्वी खाल्लं आहे, ते पाहावं. अशावेळी कॉफी किंवा लस्सी किंवा सरबत घेऊन पाहावं. पाणी प्यावं किंवा थोडं खाऊन घेणं हा तातडीचा उपाय आहे. कधी कधी रक्तातील साखर कम होते, तेव्हा काही खाल्ल्यास बरं ‍वाटतं.

अशा वेळी जड, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, खाणं टाळावं. फळ किंवा फळांचा रस घ्यावा. शक्य असेल तर १५-२० मिनिटे शांत डोळे मिटून बसावं.

टाळण्यासाठीचे उपाय

डोकेदुखी टाळण्यासाठी वरील सर्व कारणं लक्षात घेऊन उपाय योजना करावी. वेळच्या वेळी प्रमाणात खाणं, भरपूर पाणी पिणं, नियमित व्यायाम, डोळे, रक्तदाब, साखर तपासणं. व्यसनं असतील, तर हळू हळू कमी करून थांबवावीत. हे सारे उपाय योजून मन प्रसन्न ठेवावं.

एखाद्याला जर एखाद्या प्रकारच्या अन्नाची ऍलर्जी असल्यास ते टाळावं. उदा- तूप वापरून केलेले पदार्थ, चिंच, ताक, दही यासरखे आंबट पदार्थ.

About the Author